Pivot Points (Classic Pivot Points)
समजा, काल एका वस्तूचा सर्वाधिक भाव ₹११०, सर्वात कमी ₹९० आणि दिवस संपतानाचा भाव ₹१०० होता. (₹११० + ₹९० + ₹१००) ÷ ३ = ₹१००. Classic Pivot मध्ये हा आजच्या चार्टचा मधला संदर्भ भाव होतो.
चार्टवर कसं वाचायचं? मधल्या Pivotच्या वर R1, R2 आणि खाली S1, S2 दिसतात. भाव तिथे अडतो, सावरतो की रेषा पार करतो ते पाहा.
चार्टवर कसं लावायचं? ƒx / Indicators मध्ये Pivot Points शोधा. कालच्या सत्रावरून आजच्या पातळ्या पाहण्यासाठी Daily आणि गणितासाठी Classic निवडा.
इंडिकेटर लावल्यानंतर चार्ट कसा दिसतो ते पाहा.
Fibonacci Retracement
समजा, भाव ₹१०० वरून ₹१२० झाला. नंतर तो ₹११० ला आला. ₹२० वाढीपैकी ₹१० परत गेले. म्हणजे आधीच्या वाढीचा ५०% भाग परत गेला. Fibonacci Retracement अशी परत आलेली हालचाल मोजायला मदत करतो.
चार्टवर कसं वाचायचं? इथे ५०% पातळी ₹११० आहे. ३८.२% आणि ६१.८% अशा पातळ्याही दिसतात. भाव तिथे थांबतो की पुढे जातो ते पाहा. सुरुवातीचा किंवा शेवटचा भाव बदलला की पातळ्या बदलतात.
चार्टवर कसं लावायचं? Drawing Tools मध्ये Fib Retracement निवडा. वाढ मोजताना सुरुवातीच्या तळापासून शिखरापर्यंत टूल लावा. चार्ट पातळ्या आपोआप दाखवतो.
इंडिकेटर लावल्यानंतर चार्ट कसा दिसतो ते पाहा.